
द्यावी सेवेची साद ।
घ्यावा भक्तीचा प्रसाद ।।
" सर्वे भवन्तु सुखीनं : "
देणगी
आपण अशा प्रकारचे आर्थिक सहकार्य करू शकता
श्री गजानन महाराज (शेगांव) यांचा प्रकटदिन उत्सव, श्री गजानन महाराज (शेगांव) मंदिर शिवाई नगर व ब्राह्मण सेवा संघ नौपाडा, ठाणे येथे साजरा केला जातो. या दोन्ही ठिकाणांच्या प्रसादासाठी ५० हजार भाकरींची आवश्यता असते. सदरहू भाकरी मजुरी देऊन बनवून घेतल्या जातात. या मजुरीसाठी आपण आर्थिक हातभार लावून प्रसादासाठी सहकार्य करू शकता.
"आपण आपला खारीचा वाटा उचलू शकता"
"देणगी निधी"
१) ₹ ५,०००/- देणगी दिली असता, देणगीदाराचे नाव मंदिराच्या वास्तूमधील बोर्डावर लावले जाईल.
२) अभिषेक / पूजा / नंदादिपासाठी ₹ १,५००/- देणगी दिली असता आपण सुचविलेल्या दिवशी वर्षातून एक दिवस आपल्यासाठी राखून ठेवला जाईल.
३) किमान ५ वर्षे मुदत ठेव (बिन व्याजी) स्विकारली जाईल.
४) ₹ १५,०००/- दिले असता वर्षातून एका गुरुवारी त्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान (प्रसाद वाटप) करण्यात येईल (प्रकट दिन, श्रीराम जन्मोत्सव व वर्धापन दिन २३ मे, गुरुपौर्णिमा, ऋषिपंचमी, श्री दत्त जयंती गुरुवारी आल्यास तो दिवस सोडून)
आम्ही आपले ऋणी आहोत
ब्राह्मण सेवा संघ नौपाडा, आरोग्य विभाग कोपरी बाग पेटी व शिवाई नगर पेटी, नौपाडा व वर्तक नगर पोलीस स्टेशन, असंख्य जाहिरातदार, वर्षभरातील कार्यक्रमांचे हॅंडबिल्स घरोघरी पोचवणारे वृत्तपत्र विक्रेते, वर्षभरातील कार्यक्रमांसाठी आपले तन, मन, धन अर्पण करणारे हजारो भक्तगण, हस्ते परहस्ते मदत करणारे दानशूर, हितचिंतक ह्यांनीं वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल मंडळ आपणा सर्वांचे अत्यंत ऋणी आहे.
ऑनलाईन देणगी साठी तपशील खाली दिलेला आहे
PAN: AAATS4430L
80G: AAATS4430LF20206
Bank Name: TJSB SAHAKARI BANK LTD.
Account Number: 003110100034938
IFSC Code: TJSB0000003