
द्यावी सेवेची साद ।
घ्यावा भक्तीचा प्रसाद ।।
" सर्वे भवन्तु सुखीनं : "
Prayers



एका फ्लॅटवर श्री गजानन महाराज यांचे मंदिर उभारण्यात आलेले आहे . मंदिराची रचना शेगाव येतील श्री गजानन महाराज गजानन मंदिरासारखी मिळती - जुळती आहे . मंदिरात प्रवेश करताच वरच्या भागामध्ये श्री गणपती, श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई, अष्टभुजा देवी व दक्षिणमुखी दास मारुती या मूर्तींची स्थापना करण्यात आलेली आहे . तळघरात श्री गजानन महाराज ह्यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे .
मूर्तीसमोर ध्यानगृह आहे . ध्यानगृहांत महाराजांची गादी आहे . भाविकांना एकांतात ध्यानधारणा , जप , पोथीवाचन करता यावे , यासाठी संस्थेने ध्यानगृहाचे आयोजन केलेले आहे. मंदिरात शेगाव प्रमाणे सकाळी सनई - चौघडा , वंदन , काकडा आरती , अभिषेक - पूजा, सकाळी ११ वाजता आरती व नैवैद्य, सायंकाळी ७ वाजता आरती व रात्री आरती होते . मंदिरात प्रकटदिन उत्सव , श्रीराम जन्मोस्तव , दिनांक २३ मे मंदिरात वर्धापन दिन , गुरुपौर्णिमा, श्रावण महिन्यात ग्रंथ वाचन , गुरुपौर्णिमा महर्षी पंचमी (श्री गजानन महाराज समाधी दिवस ) व रामोत्सव , श्री दत्त जयंती , इत्यादी उत्सव साजरे केले जातात . त्याचप्रमाणे समाज प्रबोधनाचे काम संस्था करीत आहे .
वार्षिक कार्यक्रम
प्रकट दिन सोहळा


वर्धापन दिन


राम जन्मोत्सव




कीर्तन कार्यक्रम




गुरुपौर्णिमा





श्री संत गजानन महाराज
जीवनगाथा
माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते, अशी दंतकथा आहे. बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने 'आंध्रा योगुलु' नावाच्या पुस्तकात गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे.
गजानन महाराजांचे जीवन
गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते. त्यांचे जीवन मोठे गूढच होते. विदेही स्थितित वावरणारे गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत. भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत, असा सर्व भक्तांचा अनुभव होता. 'गण गण गणात बोते', हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत. या कारणानेच त्यांना 'गिणगिणेबुवा', 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात.