top of page

संस्था परिचय

श्री गजानन मंडळ ट्रस्ट ठाणे हि संस्था सुरुवातीस , श्री गजानन मंडळ या नावाने १९७८ साली स्थापन केले , त्यांनतर दिनांक ९ सप्टेंबर १९८२ रोजी शासनाकडे नोंदणी करून, श्री गजानन मंडळ ट्रस्ट ठाणे हि सार्वजनिक संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली . संस्थांचा नोंदणी

 क्र . - ७९७ आहे ,   कै . सदाशिव हळबे या त्यांचा मित्रपरिवाराने लावलेले रोप वाढत आहे . हे रोप वाढविण्यासाठी अनॆक भाविकांसाठी हस्ते परहस्ते जी मदत केलेली आहे ; त्यातच हे आजचे स्वरूप आहे. संस्था या सर्वांची अत्यंत ऋणी आहे.

 

संस्थेचा वतीने धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय  व सामाजिक कार्यक्रम राबविले जातात . संस्थेचा प्रकल्प ठाणे शहरातील प्रसिद्ध अशा उपवन तलावाचा पायथ्याशी उभा राहिलेला आहे .

 

एका प्लॉटवर श्री गजानन महाराज यांचे मंदिर उभारण्यात आलेले आहे . मंदिराची रचना शेगाव येतील श्री गजानन महाराज मंदिरासारखी मिळती - जुळती आहे . मंदिरात प्रवेश करताच वरच्या भागामध्ये श्री गणपती, श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई,  अष्टभुजा देवी व दक्षिणमुखी दास मारुती या मूर्तींची स्थापना करण्यात आलेली आहे . तळघरात श्री गजानन महाराज ह्यांच्या मूर्तीची स्थापना  करण्यात आलेली आहे .

 

मूर्तीसमोर ध्यानगृह आहे . ध्यानगृहांत महाराजांची गादी आहे . भाविकांना एकांतात ध्यानधारणा , जप , पोथीवाचन करता यावे , यासाठी संस्थेने ध्यानगृहाचे  आयोजन केलेले आहे.  मंदिरात शेगाव प्रमाणे सकाळी सनई - चौघडा , वंदन , काकड आरती , अभिषेक - पूजा, सकाळी ११ वाजता आरती  व नैवैद्य, सायंकाळी ७ वाजता आरती व रात्री शेजआरती  होते . मंदिरात प्रकटदिन उत्सव , श्रीराम जन्मोस्तव , दिनांक २३ मे मंदिरात वर्धापन दिन , गुरुपौर्णिमा, श्रावण महिन्यात ग्रंथ वाचन , गुरुपौर्णिमा  ऋषिपंचमी  (श्री गजानन महाराज समाधी दिवस ) व रामोत्सव , श्री दत्त जयंती , इत्यादी  उत्सव साजरे केले जातात . त्याचप्रमाणे समाज प्रबोधनाचे काम संस्था करीत आहे .

शिवाईनगर व आजूबाजूच्या विभागातील विध्यार्थाची  गरज लक्षात घेऊन , श्री गजानन  महाराजांचे निस्सीम भक्त श्री संजय चोणकर यांनी आपले वडील कै.आनंद कृष्णराव चोणकर यांचे स्परणार्थ सर्व सुविधांसह अशी अभ्याशिका मंदिराच्या पहिल्या मजल्यावर बांधून दिलेली आहे . अभ्यासिकेत १५० विध्यार्थाची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली  आहे . मुलींसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आह. अशाप्रकारे अभ्यासिकेचा लाभ अनेक विध्यार्थी घेत आहे.

 

संस्थेचा वतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठाणे जिल्यातील ग्रामिण भागात काम करणाऱ्या एका शिक्षकाच्या पत्नीसह करण्यात येतोगौरव करण्यात आला , ठाणे शहरातील गुणवत्ता यादीत आलेले विध्यार्थाचा गौरव ह्याचा दिवशी केला जातो , कै . बंडू जोशी  यांच्या स्परणार्थ  पहिल्या  वर्षी  शैक्षणिक क्षेत्रात  काम करणाऱ्या व्यक्तीस , दुसऱ्यावर्षी संस्थेच्या आरोग्य केंद्रात (विभागात ) काम करणाऱ्या व्यक्तीस , तिसऱ्यावर्षी बेरोजगार व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस गौरविण्यात येते . 

 

संस्थेचा दुसऱ्या प्लॉटवर श्री गजानन महाराज मेडिकल  सेंटर आहे . या ठिकाणी सकाळ - संध्याकाळ दवाखाना चालविला जातो . या ठिकाणी अल्पदरात तज्ञ डॉक्टरकडून ऍलोपॅथी , आयुर्वेदिक , वैद्यकीय ,होमिपॅथिक , द्वारे रुग्णांना सल्ला दिला जातो .यासाठी २५ डॉक्टरांचे सेवाभावी पॅनल आहे.

त्याचप्रमाणे पॅथॉलॉजी , एक्स रे , ई .सी . जी  च्या चाचण्यांची सोय सवलतीच्या दरात करण्यात आलेली आहे , अल्प दरात दंत चिकित्सा व शस्त्रक्रिया केली आहे .अल्प दरात चष्मा बनवूं दिला जातो . अल्प दरात मोतीबिंदु शरत्रक्रिया केली जाते . ठाणे शहरालगत स्लम विभागासाठी फिरता दवाखाना चालविला जातो . २ दिवसांचे औषध फक्त १०रुपयात दिले जाते . अशा या धार्मिक, शैक्षणिक , वैद्यकीय , सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेस सढळ हस्ते मदत करावी .

 

जय गजानन !!

New Doc 04-28-2022 11.09_1.jpg

।। गण गण गणांत बोते ।।

bottom of page