top of page

श्री गजानन मंडळ ट्रस्ट , ठाणे 

।। समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज प्रसन्न ।।

वार्षिक अहवाल ૨૦૨१-૨૦૨૨

सस्नेह नमस्कार,

मंडळाच्या वतिने या वर्षी मंडळाचे, कार्यकर्ते, हितचिंतक, देणगीदार आणि श्री गजानन महाराजांचे भक्तगण या सर्वांच्या सहकार्याने खालील कार्यक्रम उत्साहात साजरे झाले.

१) “श्रीं” चा “प्रकटदिन उत्सव":- शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी मंडळाच्या शिवाईनगर येथील श्री गजानन महाराज (शेगांव) मंदिरात व ब्राह्मण सेवा संघ, नौपाडा, ठाणे - २.  येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. दोन्ही ठिकाणी मिळून १० हजार भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला.

कोविड १९ मुळे खालील उत्सव मंडळ साजरे करू शकलो नाही.

२) “श्रीराम जन्मोस्तव"

३) "वर्धापन दिन सोहळा"

४)"गुरूपौर्णिमा उत्सव"

५) "गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शैक्षणिक कार्यक्रम"

६) "ऋषि पंचमी उत्सव"

७) नित्य उपक्रम :- दररोज सकाळी काकड आरती, पूजा, अभिषेक, सकाळी ११ वाजतां आरती, नैवेद्य, सायंकाळी ७ वा. आरती व रात्रौ ८.३० वा. शेजारती होते. (गुरूवारचे दिवशी रात्रौ ९.३० वा. शेजारती) संकष्टी चतुर्थीचे दिवशी सहस्त्रा आवर्तनाचा उपक्रम सुरू आहे. मंदिर दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत, व दुपारी ४ ते रात्रौ ८.३० वाजेपर्यंत उघडें असते. गुरुवारचे दिवशी रात्रौ ९.३० पर्यंत उघडे असते.

bottom of page